महारष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह विभागाकडे पोलीस भरती संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता . तर आता १० हजार रिक्त पदांची पोलीस भरती लवकरच ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. ही तरुण वर्गासाठी आणि ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भरतीच्या अंतर्गत बॅन्ड्समन , पोलीस शिपाई, चालक इत्यादी पदांची भरती होणार आहे. तब्बल १०००० पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील पोलीस भरती १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार ; या भरती संदर्भात नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेत १० हजार रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीच्या निवड प्रक्रियेत प्रथम मैदानी चाचणी होणार आहे , नंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. तसेच या भरतीसाठी १ हजार रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.
राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी दरामुळे पोलीस दलात अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती आणि पोलीस ठाण्याची संख्या वाढवण्याचा निर्णय अजून कागदावरच आहे. आता नवीन पोलीस भरती ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. यात रिक्त पदे १०००० एवढी आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरती होणार असून १५ सप्टेंबरपासून १०,००० पदांसाठी प्रक्रिया सुरू होईल. गृह विभागाने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांसाठी भरतीला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील एक विभाग अंतर्गत पत्र जाहीर झाले आहे.
यात रिक्त पदांचा तपशील आणि अन्य माहिती विभाग तर्फे मागविण्यात आली आहे. सध्या या पोलीस भरतीचा हालचाली विभागीय स्तरावर सुरु झाल्या आहेत. मात्र, तापमान आणि पावसाळ्याच्या अडचणींमुळे ही प्रक्रिया गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे.
नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलिस ठाण्यांचा निर्णय अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे २०२४-२५ या वर्षात रिक्त झालेल्या १० हजार पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे. पोलिस भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी गुरुवारी (ता. १७) राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. साधारणत: १० हजार रिक्त पदे असून पुढच्या महिन्यात भरतीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE