मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळतात. ते आता या महिलांचे त्यांच्या खात्यात येणे बंद होणार आहेत. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार आहे? कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे? कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नाही? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रात मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती. त्या योजनेचं नाव आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; आता मात्र या योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिलंय. २ हजार २८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता.
याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, सरकारी कर्मचारी असून पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल ३ कोटी ५८ लाख रूपये महिलांनी लाटले होते.
ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसुल करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले होते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE