आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन कडक नियम लागू ! गेल्या काही वर्षांत आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा एक मोठा दस्तावेज झाला आहे. पण याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्ड हे काही भारतीयत्वाचे अथवा नागरिकत्वाचे प्रमाण नाही. आधार कार्ड आधारे इतर अनेक दस्तावेज तयार करण्यात येतात.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावलं टाकण्याच्या तयारीत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधार कार्ड तयार करण्याच्या नियमात बदल करत आहे. त्यामुळे बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर परदेशी नागरिकांची ओळख पटवली जाईल. तर मूळ भारतीयांचा डेटा सरकारकडे जमा होईल. नवीन आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, सरकारने त्यादिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
नागरिकांचा पासपोर्ट, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरचे शालांत प्रमाणपत्र, पॅनकार्ड या सर्वांचे डेटा आधार कार्डशी पडताळणी पाहण्यात येणार आहे. त्यासाठी ही सर्व माहिती ऑनलाईन जतन करून ठेवण्यात येणार आहे. त्यांचे इंटरलिंक झाल्यानंतर, पडताळा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला आधार कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रे तयार करून आधार कार्ड तयार करण्याच्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.
UIDAI ने एक नवीन टूलचा वापर सुरू केला आहे. त्यानुसार आधार कार्डच्या नवीन नोंदणीसाठीच्या कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्यात येईल. यामध्ये वाहन परवाना, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, विद्युत बिलासारख्या दस्तावेजांची उलट तपासणी करण्यात येईल. KYC प्रक्रिया कडक करण्यात येईल. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर घुसखोरांच्या वसाहती भारतात तयार झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि इतर अनेक मोठ्या शहरात या लोकांना देशविघातक शक्ती भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी सर्व मदत करत आहेत.
त्यांचे बोगस जन्म प्रमाणपत्रापासून शाळांच्या दाखल्यापर्यंत बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली आहे. त्याआधारे त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. त्याआधारे हे घुसखोर भारतात सोयी-सुविधा मिळवतात आणि येथेच देशविघातक कृत्य करत असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आता व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE