लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १३ वा हफ्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हफ्ता जाहीर होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हफ्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाची भावना आहे.
आता मात्र सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हफ्त्यावर लागले आहे. सरकारकडून हफ्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा जुलै महिन्याच्या हफ्त्याबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे लाभार्थीमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पहायला मिळत आहे. योजनेचा लाभ नियमित मिळावा , हफ्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. लवकरच जुलै महिन्याच्या हफ्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी लाडकी बहिण योजना सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. या अंतर्गत दरमहा पात्र ठरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना दरवर्षी 18 हजार रुपयांचा लाभ मिळतोय.
खरंतर या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली आणि याचा लाभ जुलै 2024 पासून मिळतोय. या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. जुलै 2024 ते जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यातील बारावा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आला आहे.
जुलैचा हप्ता कधी मिळणार?
जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलै च्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्यातच जमा होईल असे म्हटले जात आहे. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मिळू शकतो. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेले नाही. यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यात मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE