EPFO ने आता काही नियमामध्ये बदल केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने पीएफ मधील फंड काढण्याच्या नियमामध्ये आता मोठे बदल केले आहे. ज्या नोकदार व्यक्ती स्वतः च्या घराचे स्वप्न पाहत आहे. त्यांच्यासाठी एक दिलासा दायक बाब आहे. पीएफ च्या नियमानुसार आता ज्यांना स्वतः च घर घ्यायचं आहे ते आपल्या घराच्या डाउन पेमेंटसाठी आपल्या पीएफ खात्यामधून देखील पैसे काढू शकणार आहेत. आता त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न संस्कार होईल व रियल इस्टेट व्यवसायाला याचा मोठा फायदा होईल.
फायनांशियल एक्स्प्रेसनं दिलेल्या रिपोर्टनुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, नोकरदार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ईपीएफओने हा निर्णय घेतला आहे. मात्र यासोबतच ईपीएफओकडून असा सल्ला देखील देण्यात आला आहे की, जरी तुम्ही घर खरेदी करण्यासाठी तुमचा पीएफ निधी काढणार असाल तरी देखील तुमच्या रिटायरमेंट फंडकडे दुर्लक्ष करू नका .
योग्य ते नियोजन करूनच आपल्याला किती रक्कम काढायची आहे, याबाबत निर्णय घ्या. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार ज्या व्यक्तीचं पीएफ खातं हे तीन वर्ष जुनं आहे, तो आपल्या खात्यातील 90 टक्के रक्कम काढू शकतो. अनेक नोकरदार लोकांचं आपलं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असतं, मात्र अनेकदा डाउन पेमेंटसाठी पैसे नसल्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहातं ते काही सत्यात उतरू शकत नाही. मात्र आता अशा लोकांसाठी ईपीएफओचा हा निर्णय अशेचा एक किरण ठरणार आहे.
ज्या लोकांना घर घ्यायचं आहे ते आपल्या पीएफ खात्यातील निधी यासाठी आता वपरू शकणार आहेत. ते ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार जर त्यांचं पीएफ खातं तीन वर्ष जुने असेल तर 90 टक्क्यांपर्यंतचा निधी काढू शकतात. यामुळे नोकरदार लोकांना देखील फायदा होणार आहे, सोबतच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा फयदा होऊन घरांची विक्री वाढू शकते, असं बोललं जात आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE