B.Sc नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने CET Cell राज्यातील नर्सिंग महाविद्यालयातील B.Sc नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. या अभ्यासक्रमासाठी १७ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.
बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी राज्यभरात एकूण १२ हजार ९०० शासकीय जागा उपलब्ध आहेत. खाजगी महाविद्यालयात देखील हजारो जागा उपलब्ध आहेत. मात्र, खाजगी महाविद्यालयांच्या आव्वा च्या सव्वा फी मुळे विद्यार्थ्यांचा कल हा शासकीय महाविद्यालयांकडे आहे. एप्रिलमधील सीईटी परीक्षेसाठी ४७ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी जवळपास ४३ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यानंतर मे महिन्यात निकाल जाहीर करण्यात आला. त्यास दीड महिना उलटूनही प्रवेश प्रक्रियेचा तपशील जाहीर न झाल्याने विद्यार्थी-पालक चिंताग्रस्त होते. त्यानंतर आता १७ जुलैपर्यंत शुल्क भरून अर्ज निश्चित करायची मुदत देण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे मूळ रंगीत स्वरूपात स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. त्यानंतर पुढील वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती वाचावी, चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी कागदपत्रे पडताळणीच्या अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE