एक आनंदाची बातमी आहे. गोव्या मध्ये ८३८ रिक्त जागेसाठी शिक्षक भरती होणार आहे. यासाठी त्वरित अर्ज करा ; अधिक माहिती खालील प्रमाणे आहे. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
गोव्यातील सरकारी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सध्या तब्बल ८३८ शिक्षक पदे रिक्त असून, त्यापैकी ५९२ शिक्षक कंत्राटी किंवा रोजंदारीवर काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.
आमदार व्हेंझी व्हिएगश आणि विजय सरदेसाई यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ३४७ शिक्षक, प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची १४, सहाय्यक शिक्षकांची २०८, चित्रकला शिक्षकांची २९, कॉम्प्युटर शिक्षकांची ३, सहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षकांची २११ आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची २६ पदे रिक्त आहेत.
या रिक्त पदांच्या भरतीसाठी शिक्षण विभागाने आवश्यक ती पावले उचलली असून, ३१८ प्राथमिक शिक्षक, १४ प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक आणि ११८ सहाय्यक शिक्षक यांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव कर्मचारी भरती आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, १११ सहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षक पदांसाठीचा प्रस्ताव लोकसेवा आयोगाकडे तर २१ मुख्याध्यापक पदांसाठीची थेट भरती प्रक्रिया देखील लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील ८१३ सरकारी शाळांमध्ये एकूण १,५८५ शिक्षक कायमस्वरूपी, ६५ कंत्राटी आणि ५२७ शिक्षक रोजंदारीवर काम करत असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या ५९२ शिक्षक कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात सेवा बजावत असल्याचे स्पष्ट झाले
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE