जेष्ठ कलाकारांना दरमहा मिळणार ५००० रुपये मानधन राजश्री राजर्षि शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने अंतर्गत यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे.
राजर्षि शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेअंतर्गत कला‑साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षे भरीव योगदान दिलेल्या १०० ज्येष्ठ कलावंतांना दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांचे वय किमान ५० वर्षे (दिव्यांग कलावंतांना ४० वर्षे) असावे, वार्षिक उत्पन्न ६०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि उपजीविका पूर्णपणे कलेवर अवलंबून असावी; विधवा, परितक्त्या व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल.
शासनाच्या इतर कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसलेले व महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा व रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, (लागू असल्यास) पती‑पत्नीचा एकत्र फोटो, बँक पासबुक, अपंगत्वाचा दाखला तसेच नामांकित संस्था / व्यक्तीचे शिफारसपत्र अशी कागदपत्रे जोडावी.
पात्र कलावंतांनी ३१ जुलैपर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE