महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात ५५०० प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. येत्या काळात सुमारे साडेपाच हजार प्राध्यापकासह विद्यापीठातील २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही पदे भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित अखिल महारष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिंसिपल्स असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजचे ४०वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्राध्यापक व साहाय्यक प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदाबाबत तोडगा काढला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनाने घेतलेल्या निर्णयांचा कोणताही संदर्भ न देता प्राचार्य नंदकुमार निकम यांनी केवळ प्रलंबित असलेल्या निर्णयावरच भाषण दिले. खरे म्हणजे प्राचार्य व प्राध्यापकांच्या संघटनांनी कारखान्यातील कामगारांच्या युनियनप्रमाणे मागण्या मांडणे अपेक्षित नाही, अशी खोचक टीका केली. तसेच ‘तुम्ही एक दिवस मंत्री होऊन पहा, मग निर्णय घेतानाच्या अडचणी लक्षात येतील. तरीही तुमच्यासारख्यांना संघटनेचे नेतृत्व करता यावे, म्हणून काही मागण्या प्रलंबित ठेवतो
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE