महत्वाची बातमी नोकरी इच्छुक तरुणांसाठी ; महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व जलसंधारण विभागातील ४ हजार ६०० पेक्षा अधिक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडल्याने राज्यभरातील बेरोजगार तरुण आता रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही विभागातील भरती प्रक्रियेसह विविध मागण्यासाठी ‘इंजिनीअर्स असोसिएशन’ या अभियंता संघटनेच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सरकार आंदोलनाची दखल घेऊन भरती प्रक्रिया राबवत का ? हे महत्वाचे जाणून घ्या
४ हजार ६०० पेक्षा अधिक अभियंता पदाच्या भरत्या जलसंपदा व जलसंधारण विभागात रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. १५ दिवसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाल्मी’ संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
रिक्त जागा न भरल्याने संबंधित खात्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच याखेरीज पात्र उमेदवारांवर देखील अन्याय होत आहे. तरुण अभियंत्यांमधील रोष शासनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रकुशल मनुष्यबळ असून राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या अंगभूत कार्यक्षमतेचा यथायोग्य वापर करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासनाच्या अखत्यारीतील सर्व खात्यांची रिक्त पदे भरण्यासंबंधीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE