महाराष्ट्र राज्य सरकारची १०० कोटी रुपयांची फसवूणक केल्यामुळे ३ शिक्षकांना शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक केली आहे . विशेष तपास पथकाने दिग्रस तालुक्यातील एक सहाय्यक शिक्षक, नागपुरच्या दिघोरीतील आदर्श शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आणि म्हाळगी नगरातल्या विद्याभूषण शाळेच्या सहाय्यक शिक्षिका या तिघांना अटक केली. संपूर्ण माहिती जाणून घ्या
सध्या राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची पाळेमुळे रोजच लांबताना दिसत आहेत. आतापर्यंत या घोटाळ्यात अधिकारी, संस्था चालकांना अटक करण्यात आली आहे. आता मात्र थेट लाभार्थी शिक्षकांना अटक केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
बनावट शालार्थ ओळखपत्रावरून शिक्षक बनून पगार लुटला असल्याचा आरोप ठेवत, तीन शिक्षकांना सायबर शाखेच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. यामध्ये दोन महिला सहाय्यक शिक्षिकांसह एका सहाय्यक शिक्षकाचा समावेश आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात रोहिणी विठोबा कुंभार (माध्यमिक) आणि सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (प्राथमिक) या शाळांनी पदाचा गैरवापर करीत राज्य सरकारची १०० कोटी रुपयांची फसवूणक केल्याचा ठपका ठेवत अटक केली.
विशेष तपास पथकाने दिग्रस तालुक्यातील एक सहाय्यक शिक्षक, नागपुरच्या दिघोरीतील आदर्श शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आणि म्हाळगी नगरातल्या विद्याभूषण शाळेच्या सहाय्यक शिक्षिका या तिघांना अटक केली. या तिघांनीही बनावट शालार्थ ओळखपत्राच्या आधारे नियुक्ती मिळवत वेतनापोटी २५ लाख रुपये लाटले.
त्यामुळे राज्य शासनाची फसवणूक झाल्याच्या आशयाची तक्रार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी रविंद्र पाटील यांनी दिली होती. त्या आधारे तपास पथकाने केलेल्या चौकशीत या तिघांनी बनावट शालार्थ ओळपत्राद्वारे नियुक्ती मिळविल्याचे सिद्ध झाले.
फसवणूकीत स्पष्ट सहभाग आढळल्याने एसआयटीने त्यांना अटक केली. बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकासह सायबर शाखा समांतर तपास करीत आहे. या दोन्ही पथकांनी आतापर्यंत २६ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकट्या एसआयटीच्या ताब्यातील अटकेची संख्या आता १७ झाली आहे.
यात ३ विभागीय शिक्षण उपसंचालक, ३ शिक्षणाधिकारी, ४ लिपीक, २ मुख्याध्यापक आणि २ शाळा संचालकांचा समावेश आहे. यात आता आणखी ३ शिक्षकांची भर पडली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता २९ झाली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE