शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल (TAIT results) केव्हा जाहीर होणार याबाबत परीक्षार्थीमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. मात्र,गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या संदर्भातील उलट सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. राज्य परीक्षा परिषदेने (State Examination Council ) टीएआयटी (TAIT)परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण केली असून 15 ऑगस्ट पूर्वी अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दरम्यान 11 ऑगस्ट रोजी परीक्षा परिषदेने निकालासंदर्भातील एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएस या संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. 27 मे ते 30 मे आणि २ जून ते ५ जून या कालावधीत 26 जिल्ह्यांमध्ये 60 परीक्षा केंद्रांवर 317 ही परीक्षा घेण्यात आली.
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या २ लाख 28 हजार 808 उमेदवारांपैकी परीक्षेस २ लाख 11 हजार 3008 उमेदवार प्रविष्ट झाले. शासन निर्णयानुसार उमेदवारांनी व्यावसायिक अहता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे बीएड, डीएड उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते.
बीए, डीएड परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासनाने टीएआयटी परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त होण्यास व एकत्रित करण्यास वेळ लागत आहे. पाच ऑगस्ट रोजी डीएड चा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेत पात्र उमेदवारांच्या निकालाच्या अनुषंगाने टीएआयटी च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे.
हा निकाल लवकरच राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी यूट्यूब चॅनल व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे परिपत्रक परीक्षा परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE