महाज्योती – Mahajyoti अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे सन २०२५-२६ साठी महारष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अधिकृत संकेतस्थळावर www.mahajyoti.org.in २० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या चांगल्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा .
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ही योजना इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. शासनाच्या समान धोरणांतर्गत ‘महाज्योती’ मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
राजसेवा तसेच संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाबाबतची सर्व माहिती, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना अनिवासी व ऑफलाईन माध्यमांतून प्रशिक्षण घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑफलाइन प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन तर प्रशिक्षणाच्या प्रारंभी एकरकमी आकस्मिक निधी मिळणार आहे.
प्रशिक्षण नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही वावगे यांनी कळविले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE