MPSC गट -ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी होणारी परीक्षा ही ९ नोव्हेंबर २०२५ रोजी परीक्षा होणार आहे. विविध विभागातील ६७४ जागा भरल्या जाणार आहेत. या भारतीप्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या ३९२ जागांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून अर्ज सुरू झाले असून 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक आणि वेळेत करावा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 मध्ये गट ब सेवांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा रविवार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील एकूण 282 रिक्त जागा भरल्या जाणार होत्या.
पण आता या भरती प्रक्रियेत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 392 जागांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. आता या भरतीप्रक्रियेतून पूर्वीच्या 282 आणि आता नवीन समावेश झालेल्या 392 मिळून एकूण 674 जागा भरल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, या जाहिरातीनुसार 1 ऑगस्टपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 असणार आहे. गट – ब ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये ‘पीएसआय’च्या जागा नसल्याने हजारो उमेदवारांचा हिरमोड झाला होता. तसेच फक्त 282 जागांसाठी ती जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळेही उमेदवार नाराज झाले होते.
आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या भरतीमध्ये गट ब च्या 393 जागाचा समावेश केल्याने हजारो उमेदवारांना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या भरतीची अर्जपक्रिया सुरू झालेली आहे. 21 ऑगस्टपर्यंत गट – ब भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी मुदतीच्या आत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
अर्हता/पात्रता गणण्याचा दिनांक – मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक पोलीस-१८२१/ प्र.क्र.५२/पोल-५अ, दिनांक ०४ ऑगस्ट, २०२१ अनुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दिव्यांग उमेदवार पात्र नाही. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा मूळ जाहिरातीमधील तरतुदीनुसार म्हणजेच ०१ नोव्हेंबर, २०२५ असा राहील. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ च्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज सादर करताना अपलोड करावयाच्या सर्व कागदपत्रांसंबंधीच्या तरतुदी प्रस्तुत शुद्धिपत्रकाकरिता लागू राहतील.
सदर तरतुदीनुसार उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील. प्रस्तुत शुद्धिपत्रकान्वये महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मधील पदसंख्येत बदल/सुधारणा झाल्यामुळे विषयांकित परीक्षेमधून एकूण ६७४ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE