नवीन बातमी समोर आली आहे . वैद्यकीय विभाग नाशिक येथे डॉक्टरांची ६०५ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची फार आवश्यकता आहे. नाशिक शहरातील वैद्यकीय विभागात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी केवळ ३२९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. सिंहस्थापूर्वी ही समस्या दूर करण्यासाठी महापालिका मानधनावर डॉक्टरांची भरती करणार आहे. लवकरच या संदर्भातील प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाईल. संपूर्ण माहिती वाचा.
नाशिक शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होईल. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली असताना वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची संख्या ६०५ पर्यंत पोहोचली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदे भरणे आवश्यक असतानाही वाढत्या आस्थापना खर्चामुळे शासनाकडून नोकरभरतीला हिरवा कंदील मिळत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे वैद्यकीय विभागाने आता तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय विभागाकडून आयुक्तांना सादर केला जाणार आहे. महापालिकेकडून पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य केंद्रे चावलिली जातात. तसेच नव्याने १०५ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केली जात आहेत.
सोबतच महापालिकेला २५ ‘आपला दवाखाना केंद्र’ सुरू करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना आरोग्यसेवेवर ताण येत आहे. तर, दुसरीकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागात रिक्त पदे दिवसेंदिवस वाढत आहेत. करोना काळात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला तज्ज्ञ डॉक्टरांसह ३४७ पदे भरण्यास मंजुरी दिली होती. परंतु, आस्थापना खर्चामुळे ही भरतीही होऊ शकली नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE