खुशखबर! मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगा भरती सुरु अशी नवीन जाहिरात आताच प्रकाशित झालेली आहे. या भारतीप्रक्रियेत गट – क संवर्गातील २७ पदांच्या एकूण ३५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ही एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. २२ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२५ ही आहे. या भरती संबधी अधिक माहिती खलिलप्रमाणे आहे . वाचा सविस्तर
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MBMC Bharti 2025 : मीरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२५ या भरतीत विविध विभागातील ३५८ रिक्त जागा भरण्यासाठी ही मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. या भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर, क्लर्क टायपिस्ट, सर्वेअर, प्लंबर, फिटर, पंप ऑपरेटर आणि इतर पदांचा समावेश आहे. भरतीची सर्व तपशिलवार माहिती बातमीत दिलेल्या पीडीएफमध्ये आहेत.
Mira Bhayandar Municipal Corporation Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत), सर्वेक्षक, प्लंबर, फिटर आणि पंप ऑपरेटर यांसारख्या पदांसाठी ही भरती आहे. भरती प्रक्रियेत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Job Vacancy Mira Bhayandar Municipal Corporation 2025 :या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा यांचा समावेश असेल. प्रत्येक पदासाठी पात्रता निकष आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या जागा गट क अंतर्गत असून थेट भरतीद्वारे भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
MBMC Recrutment 2025 Application Fees : अर्जाचे शुल्क – अर्जाचे शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे आहे, ज्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. खुल्या प्रवर्गाची अर्जाचे शुल्क 1000 आहे. मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गाचे शुल्क 900 आहे माजी सैनिकाला शुल्क माफ राहील.
परीक्षेच्या अंदाजे ७ दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होतील. परीक्षेची अंदाजित तारीख मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. जागांसाठी आरक्षण धोरण सरकारी नियमांनुसार असेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण टक्केवारी निश्चित केली आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण देखील लागू असेल.
Mira bhayandar mahapalika bharti 2025 Age limit – या भरतीत भाग घेण्यासाठी सर्वांना किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे.
Mira bhayandar mahapalika Recruitment 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. काही अभियांत्रिकीच्या पदांसाठी त्या-त्या अभ्यासक्रमाची पदवी आवश्यक आहे, तर काही पदवी आणि बारावीची अट आहे. तसेच काही पदांसाठी त्या क्षेत्रातील अनुभवही आवश्यक आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता भरतीच्या पीडीएफमध्ये दिली
मिरा भाईंदर महापालिका भरती नोटिफिकेशन पीडीएफ- https://www.mbmc.gov.in/assets/uploads/file-8972.pdf
मिरा भाईंदर महापालिका भरतीची परीक्षा पद्धत आणि निवड प्रक्रिया– बहुतेक पदांसाठी, परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र आणि तांत्रिक विषय यावर आधारित विभाग असतील. परीक्षेचा कालावधी आणि एकूण गुण देखील प्रत्येक पदानुसार बदलतील. निवड प्रक्रिया मुख्यतः ऑनलाइन परीक्षेवर आधारित असेल. बहुतेक पदांसाठी तोंडी मुलाखती होणार नाहीत. परीक्षेच्या निकालांवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि KYC प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड गुणवत्ता आणि पात्रता निकषांचे पालन करून केली जाईल.
मिरा भाईंदर महापालिका भरतीबद्दल महत्त्वाच्या सूचना – अर्जदारांसाठी काही सूचना आणि नियम कागदपत्रात दिलेले आहेत. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज शुल्क भरणे आणि पात्रता आणि निवड प्रक्रियेसंबंधी सामान्य नियमांचे मार्गदर्शन दिलेले आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना हे नियम काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या या भरती मोहिमेचा उद्देश विविध विभागांतील रिक्त जागा भरणे आहे. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि आरक्षण धोरणे यासारख्या तपशीलवार माहितीमुळे अर्जदारांना स्पष्टता मिळेल. अधिक माहिती वाचण्यासाठी पीडीएफ फाईलमधील माहिती वाचा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE