बँकेत नोकरी च्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2025) तर आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट अधिकारी या पदांच्या ५०० रिक्त जागेची भरती होणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ ही आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकात्मिक दुहेरी पदवी उत्तीर्ण असावी. त्यात किमान ६०% गुण असणे गरजेचे आहे. सीए (चार्टर्ड अकाउंटंट) उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गांसाठी (जसे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग) ही टक्केवारी ५५% पर्यंत कमी आहे. किमान ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा, ज्यात बँकिंग किंवा वित्तीय सेवा क्षेत्रातील कामाचा समावेश असू शकतो.
उमेदवाराचे वय ३१ जुलै २०२५ पर्यंत २२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी ५ वर्षांची सवलत मिळेल, तर इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षांची सवलत आहे. इतर आरक्षित प्रवर्गांसाठीही नियमांनुसार अतिरिक्त सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच अर्ज शुल्क खुल्यावर्गासाठी १ हजार १८० रुपये आहे तर राखीव वर्गासाठी ११८ रुपये आहे.ऑनलाईन अर्जाची लिंक आज १३ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE