Maharashtra Professor Recruitment 2025 : राज्यातील प्राध्यापक, प्राचार्य भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेकडून करण्यात आले आहेत. सरकारची मंजुरी नसतांनाही महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागातील सर्व भरती प्रक्रियेची चौकशी करून, प्राध्यापकांच्या रिक्त पदांवर प्राध्यापक भरती प्रक्रिय सुरू करण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना केली आहे. यावेळी संघटनेच्या सदस्यांनी उच्चशिक्षण कार्यालयासमोर आंदोलन केले.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी ३५८० सहायक प्राध्यापकांच्या जागा भरण्याची मंजुरी दिली. मात्र, या मंजूर पदांपैकी केवळ ४० टक्के जागा भरल्या गेल्या असून, उर्वरित जागा रिक्त राहिल्या आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या राज्यात रिक्त पदांच्या १० टक्क्यांच्या मर्यादेत राहिली पाहिजे.

मात्र, त्यांची संख्या सुमारे २० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. राज्यात एकूण मंजूर पदे ३५ हजार असून, त्यापैकी सुमारे २३ हजार सहा प्राध्यापक पदे भरलेली आहेत. त्यामुळे उर्वरित १२ ते १३ हजार पदे रिक्त आहेत. अशावेळी पूर्णवेळ प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी भरती प्रक्रियेत सीएचबी प्राध्यापकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्राध्यापक भरतीसाठी राज्यातील सहसंचालकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, त्याचे प्रातिनिधीक उदाहरण हे कोल्हापूरच्या सहसंचालकांचे देता येईल. राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्य पदांच्या भरतीत सेवाज्येष्ठतेचे निकष डावलण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांमध्ये त्रुटी काढून, त्यांना बाद करण्यात आले. विद्यापीठ, उच्च शिक्षण संचालनालय आणि संस्थाचालकांचे प्रतिनिधी मिळून अपात्र व्यक्तींची नेमणूक प्राचार्यपदी करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संदीप पाथ्रीकर यांनी केला आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीची चौकशी स्वतंत्र समितीद्वारे करण्यात यावी; तसेच राज्यातील रिक्त पदांवर पारदर्शक पद्धतीने प्राध्यापक भरती करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ. देवळाणकर यांची भेट घेऊन केली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

