वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC च्या साडे चारशे जागा रिक्त ! वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) नुकतीच ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५’ साठी  जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. या जाहिरातीत चार संवर्गासाठी एकूण ९३८ पदांची भरती जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ (एएमव्हीआय) (There is no recruitment for AMVI posts) या पदाचा यामध्ये समावेश न झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये सध्या तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MPSC Examination 2025

त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांच्या या नाराजीकडे सरकार आणि आयोग किती गांर्भियाने घेतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून यांत्रिकी अभियंता पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात शासकीय नोकरीच्या जाहिरातींचा ओघ जवळपास थांबलाच आहे. विशेषतः परिवहन विभागातील भरती तर अक्षरशः ठप्प झाली आहे. दोन जूनच्या माहिती अधिकारातील (आरटीआय) उत्तरानुसार, ‘एएमव्हीआय’ पदाच्या ६८ जागा रिक्त आहेत. सप्टेंबरमध्ये ३३१ ‘एएमव्हीआय’ अधिकाऱ्यांना मोटार वाहन निरीक्षकपदी (एमव्हीआय) ‘एएमव्हीआय’ पदांच्या ३३१ जागा रिक्त झाल्या आहेत.

याशिवाय जुलै २०२५ च्या परिपत्रकानुसार आठ नवीन उपप्रादेशिक कार्यालयांसाठी ६० नवीन ‘एएमव्हीआय’ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या सगळ्याचा एकत्रित विचार करता परिवहन विभागात ४६० पेक्षा जास्त ‘एएमव्हीआय’ पदे रिक्त आहेत. मात्र आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये या संवर्गाचा समावेश नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

महाराष्ट्र लोकसेला आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ साठी जाहिरात आयोगाच्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु जाहिरातीतून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदच गायब आहे. परिवहन विभागाने तात्काळ रिक्त जागांचे वाढीव मागणी पत्र सामान्य प्रशासन विभागा ला पाठवावे. तसेच ४६० पेक्षा अधिक पदे भरण्याची मान्यता घेऊन आयोगाने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महाऊर्जा पुणे अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती !!

Maha Urja Recruitment 2025 Maha Urja Job Recruitment 2025 – Maharashtra Energy Development Agency (MEDA), …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *