सरकारी नोकरी ची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! महाराष्ट्रात आता १५ हजार रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. त्यात नागपूर ग्रामीण आणि राज्य राखीव पोलीस दलात एकूण १ हजार ४९ रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरतीप्रक्रिया पारदर्शक असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात शिपाई संवर्गात सुमारे पंधरा हजार रिक्त पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर पोलिस आयुक्तालय, ग्रामीण आणि राज्य राखीव पोलिस गट क्रमांक चारअंतर्गत एकूण १,०४९ पदांसाठी जाहिरात निघाली आहे.
त्यात आयुक्तालयात ५९५ शिपाई, कारागृह दलात १३०, ग्रामीण विभागात २७२ शिपाई तर राज्य राखीव पोलिस गट क्रमांक चारमध्ये सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी ५२ जागांवर भरती होत आहे. या अंतर्गत इच्छुक उमेदवार ३० नोव्हेंबरपर्यंत संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहेत.
गृह मंत्रालयाने राज्यात पंधरा हजार रिक्त पदांवर पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलिस घटकांत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांनीही कंबर कसली आहे. २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही यंदाच्या पोलिस भरतीत अखेरची संधी मिळेल.
पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर म्हणाले, ‘पोलिस भरती पारदर्शक आणि तंत्रस्नेही असेल. कोणीही पैशांची किंवा अन्य स्वरूपाची मागणी केल्यास एसीबी, पोलिस अधीक्षक कार्यालयात उमेदवारांनी थेट संपर्क साधावा.
अर्ज प्रक्रिया :
policerecruitment2025.mahait.org किंवा www.mahapoilice.gov.in यावर अर्ज नोंदणी करावी.
- उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाहीत.
- सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा.
- प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी.
- शारीरिक चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड.
- पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा.
- शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर होणार.
- कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati