१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! नागपूर महापालिकेच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आता ५० हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेविषयची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नागपूर महापालिकेच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आता ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही मदत दोन टप्प्यांमध्ये दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी मोठा आधार मिळेल. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या योजनेस मंजुरी दिली आहे. यावर्षी मार्च महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळेल.
महापालिकेच्या दहावीच्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या ५० गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. त्यामुळे दहावीनंतर अकरावी व बारावी शिकणाऱ्यांना या मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. ही आर्थिक मदत यावर्षी मार्च महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी याला मंजुरी दिली आहे. दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये ही मदत मिळणार आहे. महापालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळेतील वातावरण अभ्यासाला पूरक व आनंददायी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचअंतर्गत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत.
नागपूर महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या एकूण २८ माध्यमिक शाळा आहेत. मार्च २०२५मध्ये झालेल्या शालांत माध्यमिक परीक्षेमध्ये महापालिकेच्या शाळांच्या निकालाची टक्केवारी ९०.२८ एवढी होती. पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ९४ टक्के गुण मिळाले आहेत. मनपाच्या शाळांचा नावलौकिक होत असल्याने मनपाच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्याचे आश्वासन गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मनपा आयुक्तांनी दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता करताना महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून गुणवत्ताप्राप्त ५० विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सध्या मनपातर्फे दहावीचे शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मराठी-सात, हिंदी-११, उर्दू- नऊ आणि इंग्रजी- एक अशा एकूण २८ शाळा आहेत. यातील ११ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मोठी मदत मिळणार आहे.
मुलींनाही वार्षिक भत्ता – महापालिकेच्या शाळेतील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, याकरिता मुलींना चार हजार रुपये वार्षिक उपस्थिती भत्ता दिला जात आहे. खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी मागे राहू नयेत, याकरिता मनपातर्फे विविध उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. संगणक प्रशिक्षण, शिक्षण महोत्सव आणि क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास केला जात आहे. शिवाय, आता डिजिटल बोर्ड माध्यमातून शिक्षण, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅबच्या माध्यमातून विविध प्रयोग करीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. याचबरोबर मनपातर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्र तज्ज्ञ, अशा समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन सुद्धा दिले जात असल्याने इतर खासगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळांनी एक पाऊल समोर टाकले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, पीएम श्री शाळा, मिशन नवचेतना, द हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट, स्मार्ट सिटीच्या योजनामुळे मनपा शाळेत गुणवत्ता वाढ झाली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati