बृहन्मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता (JE) या पदांच्या ८३१ रिक्त जागेच्या भरती प्रक्रियेत पदवीधारक नसलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांना सामावून घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता केवळ पदविकाधारक उमेदवारांनाच या भरतीत संधी मिळणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ती नीट वाचा.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापालिकेने ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) व (मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल) या पदांच्या भरतीसाठी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिरात दिली होती. त्याविषयीचे सुधारित नियम १८ एप्रिल २०२३ रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यातील नियम २ अन्वये या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता ही दहावीनंतर तीन वर्षांची वास्तुविशारद किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा पब्लिक हेल्थ इंजिनीअरिंगची पदविका निश्चित करण्यात आली. मात्र, पदविका मिळवून नंतर पदवी मिळवलेली असताना संधी मिळत नसल्याचे म्हणत काहींनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.
याविषयी न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. जाहिरातीतील अर्हतेविषयीच्या मुद्द्यातील ‘किमान’ शब्द वगळून अर्हता पदविकेचीच ठेवण्यात येत असल्याचे आणि पदविका मिळवून पदवी मिळवलेल्या उमेदवारांनाही संधी देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे तेव्हा स्पष्ट करण्यात आले. मात्र, पदविका मिळवून पदवी मिळवलेल्या उमेदवारांना संधी असेल, तर थेट अभियांत्रिकी पदवी मिळवलेल्यांना का नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनाही संधी देण्याचा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला. तसेच अशा पदवीधरांचा भरती प्रक्रियेतील सहभाग हा याचिकेवरील अंतिम निकालाच्या अधीन असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यावेळी त्या अंतरिम आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंती महापालिकेच्या वकिलांनी केली होती. मात्र, तीही खंडपीठाने फेटाळली होती.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati