मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे कि , आता पुणे , नाही मुंबई नाही तर सोलापूर या शहरात तिसरे मोठे IT पार्क ची स्थापना होणार आहे. लवकरच हे IT पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये ४५ हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुण्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे आयटी पार्क महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं तर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं आयटी पार्क ठरेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार नवे आयटी पार्क उभारण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. याबाबत महत्त्वाचं अपडेट समोर आलं असून आयटी पार्कसाठी सोलापुरात जागा जवळपास निश्चित झाली आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी आयटी पार्कला पर्याय म्हणून सोलापुरात हे नवे आयटी पार्क उभारण्यात येईल.
सोलापुरातील नव्या आयटी पार्कमुळे पुण्याच्या IT पार्कवरील ताण कमी होईल. तसेच नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. मागील तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आयटी पार्कसाठी जागा शोधून प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.
सोलापुरातील जलसंपदा विभागाच्या मालकीची असलेले 50 एकर जागेवर आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. ही जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच सुविधांसाठी राज्य सरकारला 38 कोटी रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे.
होटगी रोडला बांधण्यात येणाऱ्या 50 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीला विमानतळ प्रशासनाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरून निघणाऱ्या विमानाच्या फनेलमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
या आयटी पार्कचे काम दीड वर्षामध्ये पूर्ण होणार असून जवळपास 45 हजार पेक्षा जास्त कर्मचारी येथे काम करू शकतात. आयटी पार्कमधील अंतर्गत रस्ते, पाणी, पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अंदाजे 38 कोटी पर्यंतचा खर्च येणार आहे.
दरम्यान, पुण्यामधील हिंजवडी येथील आयटी पार्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आयटी पार्क आहे. त्यानतंर सोलापूरच्या आयटी पार्कची उभारणी करण्यात येणार असून याचा फायदा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati