वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CET Cell चा एक महत्वपूर्ण निर्णय ! जाणून घ्या

CET Cell चा मोठा निर्णय समोर आला आहे. जाणून घ्या सविस्तर ; महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणार विविध अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षाबाबत (Pre-syllabus exam) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. परीक्षा कक्षाने व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस, बीबीएम), संगणकशास्त्र पदवी (बीसीए) आणि हॉटेल मॅनेजमेंट (बीएमएमसीटी) या अभ्यासक्रमांसाठी (BBA, BMS, BBM, BCA, BMMCT Courses) आता संयुक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CET Cell Entrance Exam 2025

पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी पहिली संयुक्त परीक्षा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत होईल. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई (CET Cell Commissioner Dilip Sardesai) यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. आतापर्यंत हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए, बीएमएस, बीसीए या अभ्यासक्रमांसाठी दोन स्वतंत्र सीईटी घेतल्या जात होत्या.

मात्र, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दोन स्वतंत्र सीईटीऐवजी एकच सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’एमएएच-बी. एचएमसीटी/ बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम सीईटी २०२६’ असे या परीक्षेचे नामकरण करण्यात आले आहे, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, सीईटी सेलने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए, एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी पहिली सीईटी ६ एप्रिल ते ८ एप्रिल, दुसरी सीईटी ९ मे रोजी होणार आहे. गेल्या वर्षी १ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली.

एमसीए सीईटी ३० मार्च, तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाची सीईटी १ व २ एप्रिल, पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाची सीईटी ८ मे, परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमाची सीईटी ६ मे व ७ मे, शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) सीईटी २७ मार्च ते २९ मार्च, शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी (बीपीएड) सीईटी ४ एप्रिल रोजी होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर ‘जेईई मेन्स’ची दोनवेळा सीईटी घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होते. त्या धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी यंदापासून सीईटी सेलने एमएचटी-सीईटी आणि एमबीए या अभ्यासक्रमाच्या सीईटी दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत जास्त गुण असतील, ते गुण प्रवेशासाठी विचारात घेतले जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Changes in University Exam Schedule 2025

निवडणुकीच्या कारणामुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलले !

निवडणुकामुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; उच्च शिक्षण संचालकांच्या सूचना मतदानाच्या आधी एक दिवस व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *