PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा १ डिसेंबर २०२५ ला होणार होती ; परंतु निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही परीक्षा उशिरा घेतल्या जाईल. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. वाचा सविस्तर
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ही १६९ पदे भरण्यासाठी एक डिसेंबर रोजी नियोजित असलेली परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यास ही भरती रखडण्याची दाट शक्यता आहे.
या १६९ पदांसाठी ४२ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेतर्फे ‘इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन’ अर्थात, ‘आयबीपीएस’ मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. याआधी लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे भरती रखडली होती. आता महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास नही ही भरती तिसऱ्यांदा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
पालिकेने २०२२-२३मध्ये विविध पदांसाठी ७४८ जागांची भरती केली होती. त्यानंतर मार्च २०२४मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, मराठा आरक्षणाचा समावेश, सरकारची मंजुरी आणि ‘आयबीपीएस’ सोबतचा करार संपल्याने प्रक्रिया ठप्प झाली. नव्याने करार झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली; पदसंख्याही वाढवून १६९ करण्यात आली
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati