मुंबई विद्यापीठाने २०२६ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहेत.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या चार महिने आधीच आसन क्रमांक आणि परीक्षा केंद्राची माहिती डिजिटल युनिव्ह्रर्सिटी पोर्टलवर (DU portal) उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण १ लाख २३ हजार ९९८ विद्यार्थी ८९६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२६ च्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, बीकॉम, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (बँकिंग अँड इन्श्युरंस), बीकॉम (अकाऊंटींग अँड फायनान्स) आणि बीएमएस सत्र ६ च्या परीक्षा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होतील.
तसेच, बीएस्सी, बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएस्सी बायोटेक, डेटा सायन्स सत्र ६ च्या परीक्षा ८ एप्रिल २०२६ पासून नियोजित आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र ६ आणि बीएएमएमसी सत्र ६ च्या परीक्षा देखील ८ एप्रिल २०२६ रोजीच होणार आहेत. यासोबतच, विविध विद्याशाखांतील स्वयंअर्थसहाय्यित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati