वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IIM Mumbai येथे आता डिजिटल शिक्षण !

IIM आयआयएम मुंबईने आता थेट पदवी स्तरावर डिजिटल शिक्षण सुरू केले आहे. डिजिटल अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यात पारंपरिक व्यवस्थापनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी उद्योग सहकार्यावर भर दिला आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

IIM Mumbai 2025

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी तयार करेल. व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रात देशभरात ओळख निर्माण केलेल्या आयआयएम मुंबईने आता थेट पदवीस्तरावर डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, तंत्रज्ञानाधिष्ठित उद्योग आणि बदलत्या रोजगाराभिमुख क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन आयआयएम मुंबईकडून डिजिटल सायन्स आणि बिझनेस मॅनेजमेंट या विषयातील चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.

भारताच्या डिजिटल परिवर्तन प्रक्रियेला गती देण्यासाठी तसेच, उद्योगांसाठी तत्पर मनुष्यबळ घडविण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात ऑपरेशन्स, मार्केटिंग, वित्त, उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या विषयांसह पारंपरिक व्यवस्थापन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांचे एकत्रित शिक्षण दिले जाणार आहे. डिजिटलदृष्ट्या सक्षम व्यवसाय नेतृत्व करू शकतील, असे सर्वसमावेशक व्यावसायिक घडविणे, हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आयआयएम मुंबईने या अभ्यासक्रमासाठी उद्योगसहकार्यालाही विशेष महत्त्व दिले आहे. इंटर्नशिप आधारित शिक्षण, प्रत्यक्ष प्रकल्प आणि उद्योगांतील प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी सी४आय४सारख्या संस्थांसह विविध व्यावसायिक भागीदारांशी करार करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न राहता डिजिटल व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष आव्हाने हाताळण्याची संधी मिळणार आहे. तसेच, जागतिक दृष्टिकोन आणि शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी आयएमटी फ्रान्ससोबत चर्चाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी (एनईपी) पूर्णतः सुसंगत असा हा अभ्यासक्रम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, योग्य मानसिकता आणि जागतिक अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या दृष्टिकोनातून या पदवी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

भारतातील यूजी शिक्षणात आयआयएम मुंबई ला आघाडीवर नेणारा हा उपक्रम ठरेल, असे ‘आयआयएम मुंबई’चे संचालक प्रा. मनोज तिवारी यांनी स्पष्ट केले. या नव्या पदवी अभ्यासक्रमासाठी पुण्यात स्वतंत्र शैक्षणिक परिसर उभारण्यास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मान्यता दिली आहे. पुणे महानगरपालिकेने इमारत उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविल्याने आयआयएम मुंबईच्या पुणे विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Gramin Tech Bharti 2026

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अंतर्गत मुलाखतीचे आयोजन; “या” रिक्त पदांकरिता भरती !!

Gramin Tech Campus Recruitment 2025 Gramin Tech Campus Job Recruitment 2025 – Gramin Technical and …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *