वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

१० वी उत्तीर्णांसाठी ड्रोन पायलट बनण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पात्रता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ,  परभणी येथे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. यासाठी १० वी उत्तीर्ण आणि १८ ते ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती खाली दिलेली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DGCA Drone Pilot Training

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी आहे. डीजीसीए मान्यताप्राप्त या संस्थेत वर्ग शिक्षण, सिम्युलेटर आणि प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण मिळेल. लघु, मध्यम आणि संयुक्त श्रेणीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण आणि १८ ते ६५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथे ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ही संस्था, कुशल ड्रोन पायलट तयार करण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणात वर्ग शिक्षण, सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उड्डाण सत्रांचा समावेश आहे. लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (७ दिवस), मध्यम श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (७ दिवस) आणि लघु व मध्यम श्रेणी संयुक्त रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (१० दिवस) असे विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांच्याकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. प्रवेशासाठी चार पासपोर्ट आकाराचे फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह), दहावीची मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक अतिरिक्त ओळखपत्र (जसे की पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड), वरील सर्व कागदपत्रांच्या स्वयंघोषित प्रती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Bank of India Bharti for 514 posts 2026

सरकारी नोकरीची संधी ; बँक ऑफ इंडियामध्ये ५१४ पदांसाठी भरती, अर्ज मागवण्यास सुरुवात

सरकारी बँकेतील नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *