१०वी पास झालेल्या तरुणांसाठी इस्त्रायलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी ; एकूण १६०० रिक्त पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या , अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.
“माझी नोकरी”या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

परदेशात करिअर करण्याची इच्छा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तरुणांसाठी राज्य शासनामार्फत रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्या वतीने इस्त्रायलमधील बांधकाम आणि नूतनीकरण क्षेत्रातील १,६०० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.
सिरॅमिक टायलिंग एक हजार पदे, ड्रायवॉल वर्कर्स ३०० पदे, मेसन (गवंडी काम) ३०० पदे अशी १,६०० पदे आहेत
उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. तसेच उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. परदेशात दैनंदिन कामकाज व संवादासाठी किमान इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असून उमेदवाराकडे वैध भारतीय पासपोर्ट असणे बंधनकारक आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे हादेखील निकष ठेवण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र तरुणांनी या परदेशी संधीचा लाभ घ्यावा. शासनाच्या अधिकृत माध्यमातून ही भरती होत असल्याने तरुणांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार केंद्राच्या संध्या साळुंखे यांनी केले आहे
शिक्षण : किमान दहावी उत्तीर्ण
वय : २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान
अनुभव : संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक
भाषा : इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान (संवादासाठी आवश्यक)
पासपोर्ट : वैध भारतीय पासपोर्ट असणे अनिवार्य
पात्र उमेदवारांची प्रथम कौशल्य चाचणी घेतली जाईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या भरतीत प्राधान्य मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati