वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर !! IOCL मध्ये परीक्षा नाही, मुलाखत नाही फक्त मार्कशीटवर मिळणार नोकरी ! जाणून घ्या

IOCL अंतर्गत अँप्रेन्टिस भरती २०२६ ची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. ही एक सुवर्ण संधी आहे. ही भरती प्रक्रिया परीक्षेशिवाय व मुलाखतीशिवाय होणार आहे. ही भरती केवळ मार्कशीट च्या आधारावर होणार आहे. एकूण ३९४ पदे भरली जाणार आहे. याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या.

IOCL Recruitment 2026

या वर्षी एकूण ३९४ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. खास गोष्ट म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किवा मुलाखत घेतली जाणार नाही, उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारावर केली जाईल.

इंडियन ऑइलच्या पाईपलाइन विभागात ही भरती देशभरातील चार विभागांत पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण – केली जाणार आहे. यापैकी पश्चिम विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून, त्यानंतर क्रमशः पूर्व, उत्तर आणि दक्षिण विभागात भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य या भरतीमध्ये पश्चिम विभागाच्या पाईपलाइन विभागात (VWRPL) समाविष्ट आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर येथील तीन ठिकाणी एकूण १२ शिकाऊ उमेदवारांची भरती होईल. पश्चिम विभागात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान याठिकाणी एकत्रित १३६ जागा उपलब्ध आहेत.

यामध्ये तांत्रिक तसेच बिगर तांत्रिक पदांचा समावेश आहे. तांत्रिक पदांसाठी टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि इन्स्ट्रुमेंटेशन) पदांसाठी संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा आवश्यक आहे. तर ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी, जसे की असिस्टंट-HR, कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असून, अकाउंटंट पदासाठी वाणिज्य शाखेतील (B.Com) पदवी असणे अनिवार्य आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी उमेदवाराने किमान बारावी उत्तीर्ण केलेली असावी, पदवीधर नसणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेबाबत, उमेदवाराचे ३१ जानेवारी २०२६ रोजी वय किमान १८ आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची वयात सवलत दिली जाईल. सर्व उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Marathi teaching in School 2026

ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जाणार नाही त्या शाळेवर कारवाई होणार !

महत्वाची बातमी ! राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर शाळेत हिंदी विषयाच्या सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला होता. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *