राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वांवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवेत सुसूत्रता आणऱ्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून नवीन संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

या संकेतस्थळावर सर्व शिक्षकांची माहिती, शैक्षणिक अर्हता, त्यांना मिळणारे मानधन याबद्दलची माहितीबरोबरच त्यांना प्रत्येक महिन्याला मिळणारे मानधन ठरावीक तारखेला मिळेल यामध्येही पोर्टलची महत्त्वाची भूमिका असणार आहे. हे संकेतस्थळ नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून कार्यरत करण्यात येणार आहे.
राज्यातील १२ शासकीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची ६५९ पदे रिक्त आहेत. त्याशिवाय १ हजार १०० अनुदानित महाविद्यालयांमध्येही ११ हजारांपेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. या ११ हजारांपैकी ५ हजार १२ पदे भरण्यास मंजुरीही मिळाली आहे. मात्र पदभरतीची ही प्रक्रियेत असलेल्या अडथळ्यामुळे ती संथगतीने सुरू आहे. परिणामी अनेक महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये पूर्णवेळ शिक्षक नसल्याने तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या खांद्यावरच विद्यार्थ्यांच्या शिकवणीचा भार आहे. या शिक्षकांना मिळणाऱ्या मानधनामध्येही मोठी तफावत आढळते.
याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावरही होत असतो. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तासिका तत्त्वावरील शिक्षकांची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विभागाकडून एक स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार पोर्टल तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा प्रस्तावही तयार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून संकेतस्थळ सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या या संकेतस्थळावर राज्यातील प्रत्येक महाविद्यालय तसेच विद्यापीठांच्या विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकाची नोंद करण्यात येणार आहे. यामध्ये त्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, तो शिक्षक कोणत्या महाविद्यालयांमध्ये कोणते विषय शिकवतो, त्याला किती मानधन मिळते आदी सर्व माहितीची नोंद करण्यात येणार आहे. या माहितीवरून या शिक्षकांचा संपूर्ण तपशील अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच त्यांना त्यांच्या कामाचे मानधन हे प्रत्येक महिन्याला एका ठरावीक तारखेलाच मिळतील, याची खातरजमाही या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच केली जाणार असल्याचेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati