वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी !! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ !

राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. महराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांचा पगार वाढणार आहे. जुलै महिन्यात या कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या पूर्ण होणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सातवा वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. त्या बद्दल आपण जाणून घेऊ या !

या सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन वाढणार आहे. जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य होतील ? या बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Good news for Govenment Employee

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत मार्च महिन्यात वाढीची भेट मिळाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र यात सरकारकडून दोन टक्क्यांची वाढ झाली म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वर पोहोचला. ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 55% दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे.

मात्र अजून यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय आता यामध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तयार झालेला आहे. दरम्यान लवकरच या प्रस्तावावर राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल अशी बातमी हाती आली आहे. जुलै महिन्याच्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय होणे अपेक्षित आहे. या महिन्यात जर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% करण्याचा निर्णय झाला तर जुलै महिन्याच्या पगारांसोबत त्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे पण ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 55% इतका केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील. याचा प्रत्यक्षात लाभ जुलै महिन्याच्या पगारांसोबत मिळणार असल्याने जानेवारी ते जून या सहा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना दिली जाणार आहे.

वार्षिक वेतन वाढीचा पण लाभ मिळणार : राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना जुलै महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा तसेच महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय त्यांना वार्षिक वेतन वाढीचा सुद्धा लाभ मिळणार आहे. जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा लाभ मिळतो आणि यावर्षी देखील जुलैमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीन टक्के वेतन वाढ मिळते आणि यंदाही तीन टक्के वेतन वाढ मिळणे अपेक्षित आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICAR-CCRI Nagpur Bharti 2025 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ICAR-CCRI Nagpur Bharti 2025– ICAR–CCRI Nagpur (ICAR-Central Citrus Research Institute, Nagpur) is going to conduct new recruitments !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *