A ‘Mega Job Fair’ organized at Dr. Babasaheb Ambedkar University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी संस्थान (नायलिट) आणि मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१८ मार्च) महानोकरी अभियान (मेगा जॉब फेअर) आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या महानोकरी अभियानात सहभागी होणार असून विविध पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती संयोजक डॉ. गिरीश काळे यांनी दिली.
१८ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरू केली जाईल. प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देत मुलाखती घेतल्या जातील. यासंबंधी कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या लिंकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुलाखतीसाठी किमान पाच परिचय पत्र (बायो डेटा) घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. गिरीश काळे, के. लक्ष्मण आणि मॅनयुनायटेड कोर्पोरेटचे रवींद्र कंगराळकर यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील साई इलेक्ट्रिकल, बडवे इंजिनिअरिंग, कार्ल्सबर्ग इंडिया, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, लाईफलाईन डिव्हाइसेस प्रा. लि., आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, यशश्री प्रेस, मेडी-रिक्रुटर्स, कल्याण ज्वेलर्स, अल्ट्रा ब्युटी केअर तसेच ‘आयटी’ क्षेत्रातील शार्कवेब आयटी, इंडियन इंटरनेट सोल्युशन्स प्रा. लि., वेलविन पॅकेजिंग, सोडेस्को इंडिया, एस. डब्ल्यू मल्टिमीडिया, इन्फिनिटी टेक रिसोर्सेस आणि इम्फासिस यासह इतर ३५ प्रख्यात कंपन्या ८०० तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE