ACTREC Mumbai मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !
ACTREC Mumbai Recruitment 2024 :
टाटा मेमोरियल सेंटरच्या ॲडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी रिक्त जागा आहे. या जागेसाठी भरती सुरू आहे. वय वर्ष २७ पर्यंत असलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसरपदी निवड झाल्यानंतर दर महिना ३५,०००/- वेतन देण्यात येईल.
टाटा मेमोरियल सेंटरच्या ACTREC म्हणजेच ॲडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथे असलेले रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी पात्र उमेदवाराची निवड करण्यात येईल.
ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इथे सुरू असलेल्या या भरतीतून मुलाखत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. ही भरती प्रक्रिया पूर्ण करून सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. २७ वर्षांपर्यंतचे सर्व इच्छुक उमेदवार सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी मुलाखत फेरी पार पडेल.
मुलाखतीसाठीचा पत्ता-
तिसरा मजला, पेमास्टर शोधिका, टीएमसी-एक्ट्रेक, से.-22, खारघर, नवी मुंबई- 410210.
Educational Qualifications: शैक्षणिक पात्रता –
- कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक.
- NCC प्रमाणपत्र असणे आवश्यक
- कमीत कमी ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक
- इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान वरती नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या ACTREC विषयी अधिक माहिती https://www.actrec.gov.in/ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.
महत्त्वाची कागदपत्रे-
उमेदवारांनी या ‘वॉक इन इंटरव्ह्यू’साठी जाताना त्यांच्यासोबत रेझ्यूमे, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रती, शैक्षणिक पात्रते संदर्भात हमी देणारी प्रमाणपत्रे तसेच उमेदवाराच्या कामाच्या अनुभवाविषयी हमी देणारे सर्व कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे.
असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर या पदावर नेमणूक ही कंत्राटी पद्धतीने होईल. सदर पदी नेमणूक झाल्यानंतर तो उमेदवार पुढील सहा महिन्यांसाठी त्या कामावर रुजू राहील. उमेदवाराचा परफॉर्मन्स आणि संस्थेला असलेले गरज याच्या निरीक्षणानंतर हे कंत्राट पुढे वाढेल की नाही यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मुलाखतीसाठी जातेवेळी उमेदवाराने नियोजित स्थळी वेळेवर पोहोचणे महत्त्वाचे आहे. तसेच भरतीत सहभागी असलेल्या उमेदवाराने सर्व कागदपत्रे सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे.