AFMS Recruitment 2025 : देशसेवेची भावना आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची इच्छा असणाऱ्या डॉक्टरांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services – AFMS) मार्फत वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदासाठी ४०० रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एमबीबीएस किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्यांकडे वैद्यकीय परिषदेची (MCI/NMC) वैध नोंदणी असणे आवश्यक आहे. सामान्य वैद्यकीय पदवीधारक उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे तर पदव्युत्तर उमेदवारांसाठी ३५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
ही भरती लघुकालीन सेवा आयोग (Short Service Commission) अंतर्गत केली जाणार असून, निवड झाल्यानंतर उमेदवारांना देशभरातील लष्करी रुग्णालये, मेडिकल युनिट्स आणि आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देण्याची संधी मिळेल. कामगिरीच्या आधारे उमेदवारांना दीर्घकालीन सेवेसाठीही संधी दिली जाऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी AFMS च्या अधिकृत संकेतस्थळ www.amcsscentry.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे
त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट नियमित तपासावी.
निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून, शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना कॉल लेटर पाठवून पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. याशिवाय वैद्यकीय चाचणी पास करणे आवश्यक असेल. AFMS मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सामील होण्याची ही एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि प्रेरणादायी संधी आहे. जर तुम्हाला राष्ट्रासाठी आरोग्यसेवा देण्याची संधी हवी असेल, तर आजच अर्ज करा आणि देशसेवेसाठी पुढे या.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE