AFT Recruitment 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण (AFT) ने विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरातीनुसार, ‘उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – I, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड – II, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट’ या विविध पदांसाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आलेली आहे, जी मूळ जाहिरातीत दिली आहे. तसेच, प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा आणि वेतन श्रेणीदेखील संबंधित पदानुसार असतील, ज्याबद्दल अधिक माहिती मूळ जाहिरातीत दिली आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता
“रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7 वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006” असा आहे. यापदांसाठी नोकरी ठिकाण मुंबई असेल, आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

