वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय सैन्य अंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु !

भारतीय सैन्यात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. भारतीय सैन्यच्या  ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत अग्निवीर (पुरुष )  पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अंतिम तारीख १ एप्रिल २०२६ ही आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.   

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Indian Army Agneevir Bharti 2026

भारतीय सैन्याच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर’ (पुरुष) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अविवाहित पुरुष उमेदवारांना १ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सैन्य भरती कार्यालय (मुख्यालय), पुणे यांच्याकडून देण्यात आली.

पुणे सैन्य भरती कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. यात पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांतील रहिवासी असलेले पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०२६ आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) जून २०२६ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियोजित केली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. तसेच, अफवा किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयातर्फे करण्यात आले.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

आदर्श स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, जि. कोल्हापूर – प्राथमिक/माध्यमिक/संगणक शिक्षक पदांच्या ५ भरतींसाठी मुलाखत आयोजित

Adarsh School Recruitment 2026 - Adarsh School & Junior College, Wakare, Tal. Karveer, Dist. Kolhapur invites Offline applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *