केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने AI चे महत्त्व लक्षात घेऊन ‘एआय’ संबंधित ५ मोफत अभ्यासक्रम ‘स्वयम्’ पोर्टलवर सुरू केले आहेत. यात ‘एआय/एमएल युजिंग पायथॉन’, ‘क्रिकेट अनॅलिटिक्स विथ एआय’, ‘एआय इन फिजिक्स’, ‘एआय इन केमिस्ट्री’ आणि ‘एआय इन अकाउंटिंग’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विद्यार्थी घरबसल्या या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रत्येक क्षेत्रातील वाढते महत्त्व लक्षात घेत, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून ‘एआय’ संबंधी ५ मोफत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘स्वयम्’ पोर्टलवर हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून, विद्यार्थ्यांना याचा लाभघेता येणार आहे.
स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अॅस्पायरिंग माइंड्स (स्वयम्) हे एक केंद्र सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. व्हिडीओ पाठ, अभ्यास साहित्य, स्वयं मूल्यमापन व ऑनलाइन चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम शिकता येतात.
या पोर्टलवर आता केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत ‘एआय’ संबंधित पाच नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘एआय/एमएल युजिंग पायथॉन’ असा एक अभ्यासक्रम असून, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग विषयातील महत्त्वाच्या संकल्पना, डेटा सायन्सची प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणून पायथॉन अशा विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात असेल. डेटा व्हिज्युअलायझेशन तंत्रासह सांख्यिकी, बीजगणित यातील महत्त्वाच्या संकल्पनांवर या अभ्यासक्रमात प्रकाश टाकण्यात आला आहे.
शालेय जीवनातील गणित आणि प्रॉग्रॅमिंगची मूलभूत जाण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. दूसरा अभ्यासक्रम ‘क्रिकेट अनॅलिटिक्स विथ एआय’ हा असून, या माध्यमातून स्पोर्टस् अनॅलिटिक्सच्या मूलभूत संकल्पना समजण्यास मदत होईल. डेटा सायन्स आणि पायथॉन प्रोग्रॅमिंगचाही यामध्ये समावेश आहे.
‘एआय इन फिजिक्स या अभ्यासक्रमामध्ये फिजिक्समधील समस्या सोडविण्यासाडी मशिन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क या एआय टूल्सचा वापर कसा केला जाईल, हे विद्यार्थ्यांना समजून घेता येणार आहे. संवाद सत्रे, प्रात्यक्षिक, एआय तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर यांचा समावेश अभ्यासक्रमात आहे. पदवीचे विद्यार्थी हा अभ्यासक्रम शिकू शकतात. ‘
एआय इन केमेस्ट्री’ आणि ‘एआय इन अकाउंटिंग’ हे दोन अभ्यासक्रमही शिक्षण मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केमिस्ट्रीसाठीच्या अभ्यासक्रमात केमिस्ट्रीच्या विविध शाखांमध्ये एआयचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन मिळेल. त्याचसोबत मूलद्रव्यांचे गुणधर्म, औषध निर्मितीसह रासायनिक अभिक्रियेसाठी ‘एआय’ टूलचा वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन मिळेल. अकाउंटिंगबाबतचा कोर्स कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE