JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS ने आणली नर्सिंग क्षेत्रात बंपर भरती; त्वरित करा अर्ज !

AIIMS ने आणली नर्सिंग क्षेत्रात बंपर भरती; त्वरित करा अर्ज !

AIIMS Recruitment 2024 :

नर्सिंग ऑफिसरच्या रिक्त पदांसाठी ही भरतीप्रक्रिया घेण्यात येणार असून अर्जप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराना AIIMS परीक्षेसंबंधित असणाऱ्या अधिकृत वेब साईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी कामाची सुवर्णसंधी आणली आहे. नर्सिंग ऑफिसरच्या रिक्त पदांसाठी ही भरतीप्रक्रिया घेण्यात येणार असून अर्जप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराना AIIMS परीक्षेसंबंधित असणाऱ्या अधिकृत वेब साईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टला सुरु झाली आहे तर उमेदवारांना २१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे निवड प्रक्रियेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास AIIMS च्या १५ संस्थनांपैकी एका ठिकाणी नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी rrp.aiimsexams.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जप्रक्रिया पूर्ण करावी.

अर्जप्रक्रिया करण्यापूर्वी उमेदवार AIIMS द्वारा जरी केले गेलेल्या अटीशर्तींना पात्र असावा. याचा अर्थ कि, उमेदवाराकडे बीएससी ऑर्नर्स नर्सिंग किंवा बीएस नर्सिंग किंवा बीएससी किंवा जनरल नर्सिंग मिडवाईफरीमध्ये दोन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे. तर वयोमर्यादेत आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना काही सूट देण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आणखीन ३ वर्षांपर्यंत सूट असेल तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना आणखीन ५ वर्षांपर्यन्त सूट मिळणार आहे. निवडप्रक्रियेत २ टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ९० मिनिटांची प्री एग्जाम होईल तर दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा घेतली जाईल.

अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी एक बाब लक्षात घ्यावी ती म्हणजे अर्ज सबमिट करण्याअगोदर अर्जशुल्क भरावे लागणार आहे. अर्जशुल्कामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना काही प्रमाणात सूट दिली गेली आहे. जनरल प्रवर्गातील उमेदवारांना ३००० रुपये अर्जशुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देखील ३००० रुपयांचेच भुगतान करावे लागणार आहे. तर ST/ SC/ EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्जशुल्क म्हणून २,४०० रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे दिव्यांग उमेदवारांना अर्जशुल्क माफ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *