An indefinite protest has started for the recruitment of professor posts in the state : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पूर्ण भरती अद्याप केली गेलेली नाही. यामुळे NEP चा अंमल करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
त्याचबरोबर प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरण्यासाठी विविध संघटनांकडून वेळोवेळी आंदोलनं केली जात आहेत. यापुढे ७ एप्रिलपासून नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून ‘बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी’ हा सत्याग्रह आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर सुरु होणार आहे.
राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कार्यालयाच्या आदेशामुळे स्थगित होती. ताज्या आदेशानुसार याची स्थगिती हटवली असून विद्यापीठांतील प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे मात्र, राज्यातील विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या हजारो पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक वेळा प्राध्यापकांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु त्यावर अजूनही अमल केला गेलेला नाही. यामुळे नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून ७ एप्रिलपासून “उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी, मुख्यमंत्र्यांच्या दारी” या घोषणेसह बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये समितीच्या मुख्य मागण्यांमध्ये समावेश आहे:
केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १००% प्राध्यापकांची भरती करणे.तासिका पद्धती बंद करून समान काम, समान वेतन तत्त्वानुसार प्राध्यापकांना दरमहा ८४,००० रुपये वेतन देणे.
विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करणे.
२४ नोव्हेंबर २०२१ पूर्वीच्या मान्यताप्राप्त ७८ महाविद्यालयांना अनुदान देणे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १००% भरती करणे.
या सर्व मागण्यांसाठी नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून ७ एप्रिलपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE