वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ !!

The salary of Asha and Anganwadi employees in the state will be increased before Lok Sabha elections. West Bengal Chief Minister Mamata Banerjee announced this on Wednesday. Making the announcement in a video posted on social media Facebook, Chief Minister Mamata said that the salary of Asha and Anganwadi workers will be increased by Rs 750 per month.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ही घोषणा केली. सामाजिक माध्यम फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी ही घोषणा केली, मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की, आशा आणि अंगणवाडीसेविकांचे मानधन दरमहा ७५० रुपये वाढवले जाईल.

राज्यातल्या आशा आणि अंगणवाडीसेविकांना दरमहा ८,२५० रुपये मिळत होते आणि या वाढीमुळे ते ९,००० रुपये दरमहा होतील. तसेच अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनातदेखील ५०० रुपये वाढीची घोषणा ममता यांनी यावेळी केली. अंगणवाडी मदतनिसांना यापूर्वी ६,००० रुपये दरमहा मिळत होते आणि या वाढीमुळे ते ६,५०० रुपये दरमहा त्यांचे मानधन होईल, त्या म्हणाल्या. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू होईल.

About MahaUpdates

Check Also

Mazi ladki bahin yojana new update

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार ५०० रुपयांचा लाभ ! जाणून घ्या माहिती

लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, काही पात्र महिलांना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत सुमारे ५० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला, सरकारी कर्मचारी, कुटुंबात चारचाकी वाहन असणे किंवा एकापेक्षा अधिक योजना घेतलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *