JOIN Telegram
Thursday , 15 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

खुशखबर! अंगणवाडी मदतनीसची भरती सुरु, १२ वी पास महिलांना सरळ नोकरीची संधी-अर्ज सुरु!

महिला बालविकास विभागात नोकरीची एक मस्त संधी १२ वी पास महिलानसाठी चालून आली आहे. या अंतर्गत निवड झालेल्या महिलांना सरळ नोकरी मिळणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS Mahila Bal Vikas Vibhag Bharti), शहरी प्रकल्प, जिल्हा प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवायचे आहे. तसेच अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असलल्यामूळे तसेच स्थानिक रहीवाशी असावो या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचान्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही हे उमेदवाराने लक्षात ठेवावे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज वरील प्रमाणे नमूद पत्यावर मागणी करण्यात येत आहे. अंगणवाडी मदतनीस या मानधन, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र  अटी व शर्ती आणि अन्य महत्वाची माहिती आपण बघूया.  

 

Mahila Bal vikas Anganwadi Madatnis Bharti

चला तर या भरती बद्दल विस्तृत माहिती बघूया,  एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नागरी प्रकल्प, परभणी यांनी प्रकाशित केलेल्या नवीन जाहिराती अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भतील जाहिराती परभणी जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर आज प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती ०२ रिक्त पदांकरिता ही भरती असून नोकरीचे ठिकाण परभणी राहणार आहे. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे १२  वी पास महिलांना नोकरीची छान संधी उपलब्ध झाली आहे.  तसेच, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. ७५००/- मानधन दिले जाईल सोबतच सरकारच्या इतर योजना मधून वेळेवेळी इन्सेटिव्ह मिळत असतात. तसेच अर्जदाराला मराठी भाषेचे उत्तम माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने इयत्ता १० वी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आता जाणून घेऊया वयोमर्यादेविषयी, तर या भरती साठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली असून विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे.  अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा: मा. बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, परभणी या पत्यावर पाठवायचे. तसेच जर उमेदवार हा नियुक्तो आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसापर्यंत रुजू झाला नाही किवा त्यास अपात्र ठरविण्यात आले तर प्रतिक्षा यादीतोल गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहिर झाल्यापासून एक वर्षे अथवा नविन भरती प्रक्रिया यांपैकी जी प्रक्रीया अगोदर घडेल तोपर्यंत वेध राहील

अर्ज करण्यापूर्वी खालील महत्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या: 

  • उमेदवाराने फॉर्म काळजीपूर्वक वाचुन स्वहस्ताक्षरात पुर्णपणे काळजीपुर्वक भरावा
  • फॉर्मवर खोडतोड करू नये.
  • एका उमेदवाराने केवळ एकच फॉर्म भरावा, एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी,
  • सोबतच दिलेले लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सर्व महिला उमेदवारांनी भरणे अनिवार्य आहे.

 

 

 

About MahaBharti MP Jobs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *