JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एप्रिलमध्ये होणार इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मूल्यांकन चाचणी

The school education department has decided to conduct the annual examination for the students of class V to VIII from this year. Accordingly, periodical assessment test will be organized from 2nd to 4th April for students of 3rd to 8th standard in all the schools of the state. Kamaladevi Awte, Deputy Director of the State Educational Research and Training Council informed that the fifth and eighth annual examination will be organized after that. The annual examination of class V and VIII will be based on the syllabus of the second semester.

शालेय शिक्षण विभागातर्फे यंदापासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे २ ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेचे आयोजन होणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक कमलादेवी आवटे यांनी दिली. इयत्ता पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

या वार्षिक परीक्षांसाठी पाचवीला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित व परिसर अभ्यास हे विषय, तसेच इयत्ता आठवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र हे विषय असणार आहेत. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषासाठी (एकूण १० माध्यम) तीन नियतकालिक मूल्यांकन (पॅट) चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

अनुत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा परीक्षेची संधी
पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयांत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्या विषयांसाठी शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केले जाईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *