महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आज २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, त्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत देण्यात आली आहे.
शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (TAIT) २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आज २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, त्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत (Deadline is May 10th) देण्यात आली आहे.
पवित्र संकेतस्थळामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येणार आहे. दोनशे गुणांच्या या परीक्षेत १२० गुण अभियोग्यता, तर ८० गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात नावाची नोंद करताना ती आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही बदल असल्यास उमेदवाराला परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे,अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अराखीव गटातील उमेदवारांना ९५० रुपये आणि राखीव गटासाठी ८५० रुपये शुल्क आकारण्यात आला आहे. उमेदवारांना मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून, मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक राहणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE