वैद्यकीय पदवी , पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तब्बल ८ हजार जागा वाढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जात आहे. अशी माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे (National Commission for Medical Sciences) (एनएमसी) प्रमुख डॉ. अभिजात शेठ (NMC Chief Dr. Abhijat Sheth) यांनी दिली. नीट-यूजी २०२५ साठी सध्या समुपदेशन सुरू आहे व पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा २५ ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सीबीआयने केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी), आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिनिधींचे अधिकारी यांचे जाळे झाले. या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत बेकायदेशीर फेरफार यासह अनेक ‘गंभीर’ कृतीमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.सीबीआयने चौकशी सुरु केल्यानंतर, एनएमसीने जागांची संख्या वाढवण्याची किंवा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया थांबवली. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या काही प्रमाणात जागा कमी झाल्या आहेत.
डॉ. शेठ यांनी सांगितले की, माझ्या नियुक्तीसोबतच वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग बोर्ड (एमएआरबी) चे अध्यक्षदेखील नियुक्त करण्यात आले आहेत. आम्ही प्राधान्याने पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या वैद्यकीय जागांची तपासणी पूर्ण केली आहे आणि मूल्यांकनाचे काम सुरू आहे. या शैक्षणिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार, आम्हाला सुमारे ८ हजार जागांची वाढ अपेक्षित आहे.
सध्या देशात १ लाख १८ हजार ९८ एमबीबीएस जागा आहेत. त्यापैकी ५९ हजार ७८२ सरकारी आणि ५८ हजार ३१६ खासगी संस्थांमध्ये आहेत. पदव्युत्तर जागांची संख्या ५३ हजार ९६० आहे. त्यापैकी ३० हजार २९ सरकारी आणि २३ हजार ९३१ खासगी क्षेत्रात आहेत. मागील शैक्षणिक सत्राच्या तुलनेत एमबीबीएसच्या एकूण जागांमध्ये घट झाल्याबद्दल डॉ. शेठ म्हणाले, सध्या सुरू असलेल्या (सीबीआय) चौकशीमुळे पदवीपूर्व जागांची संख्या कमी असू शकते. मात्र, एकूण तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांची संख्या ८ हजार किंवा त्याहून अधिक वाढणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE