वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

अकरावी प्रवेशा च्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर !

11th online admission 2025

अकरावी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान दुसऱ्या विशेष फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी आज, मंगळवारी (दि.१९) जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना उद्या, बुधवार (दि.२०) अखेर आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक विभागात अकरावीच्या रिक्त जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर झाली असून, पात्र विद्यार्थ्यांची यादी आज प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २० ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. त्याचबरोबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाची दुसरी फेरी लांबणीवर पडली असून, मार्गदर्शकांना रिक्त जागांची माहिती देण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. 

Read More »

NEET PG चा निकाल या तारखेला जाहीर होणार !

NEET PG Result 2025

राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळ (NBEMS) द्वारे NEET PG 2025 परीक्षा (NEET PG 2025 Exam)दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. 3 ऑगस्ट रोजी देशभरातील 301 शहरांमधील 1052 परीक्षा केंद्रांवर नीट पीजी परीक्षा घेण्यात आली. यावेळी 2.42 लाख उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आता हे सर्व उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. आता लवकरच संपणार आहे. NBEMS द्वारे जारी केलेल्या माहितीपत्रकानुसार, NEET PG 2025 चा निकाल 3 सप्टेंबर 2025 रोजी ऑनलाइन (NEET PG 2025 result on 3rd September 2025) माध्यमातून जाहीर करण्याचा येणार आहे.

Read More »