वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नाशिकमध्ये उभारला जाणार ‘आयुर्वेद गुरुकुलम्’

नाशिकमध्ये उभारला जाणार ‘आयुर्वेद गुरुकुलम्’

Ayurveda Gurukulam Nashik : नाशिकमध्ये ‘आयुर्वेद गुरुकुलम्’ उभारणार, बीएएमएस अभ्यासक्रमाची सुरूवात नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये ‘आयुर्वेद गुरुकुलम्’ या संकल्पनेवर आधारित बीएएमएस (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन) पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने संस्कृत विद्यापीठाने हा अभ्यासक्रम विकसित करण्याचे कार्य सुरू केले आहे. दहावी नंतर प्रवेश परीक्षेद्वारे साडे सात वर्षांचा हा अभ्यासक्रम असणार आहे, ज्यात पहिल्या दोन वर्षांमध्ये तयारी व उर्वरित साडे पाच वर्षांमध्ये मूळ अभ्यासक्रम शिकवला जाईल.

Ayurvedic Gurukulam in Nashik

केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. विद्यापीठासाठी नाशिक जिल्ह्यातील शिलापूर येथील ४१ एकर जागेची निवड करण्यात आली असून, नुकतीच राज्य सरकारकडून या जागेला मान्यता मिळाली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडे यांनी दिली. या जागेवर विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. सध्या विद्यापीठाचे कामकाज ओझरमधील टाकेकर शिक्षण संस्थेत सुरू आहे.

आयुर्वेद गुरुकुलम् काय आहे?

आयुर्वेद गुरुकुलम् हा एक पूर्णपणे नवीन अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास संस्कृत भाषेतून करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरेचे विविध पैलू आणि उपचार पद्धतींचा समावेश असेल. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून दहावी नंतर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे, ज्यामुळे आयुर्वेदाची गहनता आणि संस्कृतचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रगल्भता मिळवता येईल.

काय होणार फायदा?

हे नवीन मॉडेल आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जे विद्यार्थी आयुर्वेदाचे खरे ज्ञान मिळवण्याची इच्छा ठेवतात, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम योग्य ठरेल. तसेच, पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि संस्कृत भाषेचा अभ्यास विद्यार्थ्यांना एकत्रितपणे करता येईल. केरळसारखी राज्ये आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान चांगल्या प्रकारे वापरत आहेत, आणि या नवीन अभ्यासक्रमामुळे हे ज्ञान देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवता येईल.

नवीन विद्यापीठाच्या कॅम्पसची उभारणीसाठी पुढील पाच वर्षात सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BMC Job Vacancy 2024

BMC LTMGH – रु. २०,०००/- दरमहा वेतन ; न्यूरॉलॉजी तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करा !

BMC LTMGH Paramedical Job 2025 - Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *