JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

११८ अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर !!! उर्वरित १७ अभ्यासक्रमांचाही निकाल ७ मार्च रोजी जाहीर होईल

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University along with its affiliated colleges conducted the sessional examinations in the months of November/December of 135 courses in the departments of the university. Exam Director Dr.  Bharti Gawli informed that the result of 118 of them has been announced.  The result of the remaining 17 courses will also be announced on March 7.

Chancellor Ramesh Bais had ordered all the universities in the state to declare the results of the examinations within 30 days. Accordingly, the examination department of the university started the work of answer sheet evaluation as soon as the paper was released

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांसह विद्यापीठामधील विभागांतील १३५ अभ्यासक्रमांच्या नोव्हेंबर / डिसेंबर महिन्यांत सत्र परीक्षा घेतल्या होत्या. त्यातील ११८ चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. उर्वरित १७ अभ्यासक्रमांचाही निकाल ७ मार्च रोजी जाहीर होईल. परीक्षांचा निकाल ३० दिवसांत जाहीर करण्याचा आदेश कुलपती रमेश बैस यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांना दिला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पेपर होताच उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात केली होती.

‘त्या’ २० प्राध्यापकांवर कारवाई अनेक प्राध्यापकांनी मूल्यांकनाचे काम केले नाही. त्यामुळे गती मंदावली. त्याचा परिणाम निकाल घोषित होण्यावर झाला. २० प्राध्यापकांनी मूल्यांकनाच्या कामात टाळाटाळ केली. अशा प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा मंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *