JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BECIL १० वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईत सरकारी नोकरी !

BECIL १० वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईत सरकारी नोकरी !

BECIL Mumbai Recruitment 2024 :

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे मुंबईत भरती सुरू आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर/ कनिष्ठ सहाय्यक (प्रशासक) आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती सुरू आहे यात दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना देखील संधी आहे. या पदांवर रुजू झाल्यानंतर दर महिना २७,०००/- ते २९,८५०/- इतके वेतन मिळणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊ.

BECIL म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड तर्फे मुंबई येथे भरती सुरू आहे. ही भरती डेटा एन्ट्री ऑपरेटर किंवा ज्युनियर असिस्टंट (एडमिन) आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरू आहे. या भरतीतून एकूण तीन रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी ३० जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर/ कनिष्ठ सहाय्यक (प्रशासक) आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांच्या तीन रिक्त जागा आहेत.

पात्रतेचे निकष-

वय वर्ष 55 पर्यंतचे सर्व इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • उमेदवार जर डेटा एन्ट्री ऑपरेटर/ कनिष्ठ सहाय्यक (प्रशासक) पदासाठी अर्ज भरत असेल तर त्याने संगणक विज्ञान किंवा माहिती
  • तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी असणे किंवा याच तुलनेची इतर विषयातील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार जर मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करत असेल तर तो दहावी/बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • वरती नमूद केलेल्या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • सोबतच उमेदवारांना BECIL येथील रिक्त पदांसाठीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीनेच करता येईल.

डेटा एन्ट्री ऑपरेटर/ कनिष्ठ सहाय्यक (प्रशासक) या पदासाठी एक जागा रिक्त आहे. या पदी रुजू झाल्यानंतर दर महिना २९,८५०/- इतके वेतन मिळेल. मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. या पदावर रुजू झाल्यानंतर दर महिना २७,०००/- इतके वेतन मिळेल. अर्जदारांमधून निवडक उमेदवारांची निवड केली जाईल व पुढे त्यातून मुलाखत पद्धतीने त्या त्या पदासाठी अंतिम उमेदवाराची निवड केली जाईल.

येथे भरा अर्ज-
इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांना हे अर्ज BECIL च्या www.becil.com या अधिकृत संकेतस्थळावर मिळतील. संकेतस्थळावर गेल्यानंतर तेथे करियर्स सेक्शन इथे जाऊन तिथे रजिस्ट्रेशन फॉर्म साठी असलेल्या बटणावर क्लिक करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *