मोठा निर्णय सरकारचा जुलै २०२५ पासून सुरु होणाऱ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (१ जुलै ते ३० सप्टेंबर) विविध स्मॉल सेविंग स्कीम्सवर चालू व्याज दर कायम राहतील.
ही सलग पाचवी तिमाही आहे जिथे कोणत्याही स्मॉल सेविंग स्कीम्सवरील व्याज दरात बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीमध्ये काही योजनांमध्ये व्याज दार वाढवण्यात आले होते. त्यानंतर मात्र सर्व योजना स्थिर दरावरच ठेवण्यात आल्या आहेत.

सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीस सर्व स्मॉल सेव्हिंग योजनांच्या व्याज दराचे पुनरावलोकन करते. यामुळे चलनवाढ, रेपो दर, अर्थव्यवस्थेतील बदल आदी बाबींचा विचार केला जातो . पण यावेळी सरकारने स्थैर्याची भूमिका घेतल्यामुळे गुंतवणूकदारांना चालू दरच मिळणार आहेत.
सरकारी योजनांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी सध्याची स्थिती दिलासादायक आहे. विशेषतः PPF, NSC,MIS आणि सुकन्या समृद्धी यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना याच व्याज दरावर फायदा मिळत राहील. चलनवाढीच्या पार्श्वभूमीवर स्थिर व्याज दर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati